Tuesday, 14 August 2018

जगात नसणारा बाबा........!

जगात नसणारा बाबा.....!

मरती रात्र नि जागा झालेला दिवस....!
ह्या हलक्याशा काळजाला न सोसणारा आघात.....!
स्वप्नान बहरलेला गुलमोहर फुलणार तोवर कोमेजला......!
पुसल्या गेल्या त्या भावना नि
वाहत्या पाण्यासारखा तो आधारही वाहतच गेला......!
स्वतः ला सावरण्याचा प्रयत्न केला
मात्र तो देह ही ढासळला......!
काळीज होतं ते आता राहिलेलं फक्त बापाच्या आठवणी जपण्यासाठी......!
जीवनातलं खर सुख तर बाप होता
आता जगणं मात्र कठीण झालं होतं
देह जळून सुद्धा तोच देह थंड झाल्याचा थंडावा मात्र आता ह्या देहाला देतोय .....!
बापाचा आधार आधी कोवळ्या उन्हासारखा तर होताच
मात्र तो अजूनही सावलीनं वेढलेल्याचा भास होतोय
ह्या हलक्याशा काळजाला.....!

तुझी चिमुकली
            अंतरंगी अमू.......!

No comments:

Post a Comment