Tuesday, 24 February 2026

ती.......

ती.......!
जिवापोटी जन्म दिला मायेपोटी मायबाप दिला
 हाती ओंजळ करता पदराचा गालिछा केला .....!
 भुकेल्या त्या मायबापानं कष्टाचा विस्तव पेटवला अन चिमुकल्या पोटी घास भरवला .........!

जिवापोटी जन्म दिला अन मायेपोटी मायबाप दिला
शून्य नशिबात येता जगण्याच्या वाटेत काटा दिला......!
जन्म मृत्यूच्या दाराशी दुःख कवटाळून एक नाणा कमावण्याचा आसरा दिला अन
चिमुकल्या हाती दुःख लपवण्याचा आरसा दिलास.....!
तुझी चिमुकली
                      अंतरंगी अमू......!💫💫💫

Wednesday, 18 February 2026

एक एकटी (अंतरंगी अमू)....

एक एकटी....! 

एकटी एकटी घाबरलीस तर,
 कसं जगणार जगणं 
संवेदनेच्या गाभाऱ्यात 
अखेर तसंच राहीन तुझं वावरण ....!

भावना व्यक्त केल्यास तर,
त्याचं होईल रोजनिशीच नं चुकलेल गाऱ्हाणं 
दुःखाचा गुंता सोडवण्यात थांबवशील स्वतःलाच सावरणं........!

न विचारे तुज कोणी 
कशी आहेस म्हणूनी 
अपेक्षेची आस काही केल्या 
तुलाच कवटाळून घ्यावी.....! 

नकोशी असतेस तू जेव्हा 
तेव्हा तुझिया भास आठवी 
गरज जेव्हा असे तुझी
तेव्हा हे जग तुजला 
अहंकारी वृत्तीत साठवी.....! 

डोळ्यात अश्रू असता 
पुसण्याचा भास तो असतो
परंतु वेळप्रसंगी मायेनं बिलगुनी 
पुसण्यास कोणीही नसतो.....! 

दाटला श्र्वास फुलवूनी 
मोठ्यानं घ्यावयाची आहे झेप तुझीच तुजला....!  
या तळमळत्या जीवाचा भार तू कोणास देणे बरे नाही
स्वतःची किंमत पुन्हा पुन्हा शून्यापशी करवून घेणे बरे नाही
तरीही जग म्हणूनी स्वतःला 
स्वच्छंदी रहा तुझीच तुजला अन् घे भरारी.....! 

अंतरंगी अमू 


Friday, 3 January 2025

युगस्त्री सावित्रीबाई फुले

पहिल्या  महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...... 

असं म्हणत आपण २०२४ चा टप्पा पूर्ण करीत २०२५ च्या युगपर्वात पदार्पण केलं.
लहापणापासूनच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचा जिव्हाळ्याचा नाजूक असा कोपरा

इथे प्रश्न फक्त त्यांनी केवळ अंगावर झेललेल्या शेणा मातीचा नव्हे तर हा खूप नाजूक विषय आहेच म्हणा,  दगड धोंडे अगदी रक्तपात होईपर्यंत ओले  घाव सोसून क्रांती केली तेव्हा आज तुम्हा आम्हा शिक्षणाचा पाया मजबूत झाला. लिहिता वाचता येऊ लागलं तेव्हा कोण कुठले धूर्त इंग्रज, ब्रिटिश , सरकार, याचे पडसाद उमटले 
मुलींना शिक्षणासोबत स्व संरक्षण काय असत याचीही परिभाषा ज्ञात झाली. स्वैराचार पाठीशी टाकून लढून  शिक्षण आणि संरक्षण सार्थकी लावली. 
जागे व्हा, उठा आणि शिक्षित व्हा, परंपरा मोडून काढा आणि मुक्त व्हा अशा जुजबी ओळख निर्माण करणाऱ्या युगस्त्री म्हणजेच क्रांतीकारी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना स्मरून सांगायचं झालं तर आजही त्यांचे अस्तित्व आणि  त्यांची तत्त्व आचरणात आणली जातात. यापुढेही पुढील नवतरूणांच्या नवपर्वात ते कायम राखले जाईल. 
शिक्षण हे केवळ दर्जा, पात्रता, बुद्धिमत्ता किंवा भेदभाव या जोरावर महत्त्वपूर्ण होत नाही तर ते अधिकतम जिद्द, चिकाटीच्या बळावर प्राबल्यित होत असत ही शिकवण ज्योतिबा फुले आणि शिक्षिका सावित्रीबाई फुले यान देऊन, घडवून आणि शिकवून शिक्षण सार्थकी ठरविले. 
पुन्हा एकदा शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन......! 

Monday, 25 May 2020

अमेरिकेची अंतराळ विज्ञान विश्र्वाकडे नवी वाटचाल, पुन्हा सुरु होणार मानवनिर्मित मोहीम !


अमेरिकेची अंतराळ विज्ञान विश्र्वाकडे नवी वाटचाल, पुन्हा सुरु होणार मानवनिर्मित मोहीम !

४८ तासानंतर अमेरिकेच्या विज्ञानाचा इतिहास बदलणार आहे. अमेरिका अंतराळ विज्ञानविश्वात एक नवे पाऊल टाकणार आहे. या प्रसंगाचे साक्षीदार स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील वैज्ञानिक बंधुवर्ग असतील. अंतराळातील मानवनिर्मित मोहिमेविषयी ४८ तासानंतर घडणारी घटना ही एक मैलाचा दगड म्हणून सिद्ध होऊ शकते. याविषयी पाहूया पुढीलप्रमाणे.
२७ मे २०२० रोजी सायंकाळी 4 वाजून 33 मिनिटांनी नासा दोन अमेरिकन अंतराळवीरांना अमेरिकन क्षेपणास्त्राद्वारे (आय एस एस) वर पाठविणार आहेत. जे अमेरिकन अंतराळवीर या मोहिमेतील अंतराळ स्थानकावर रवाना होणार आहेत, त्यांचे नाव रॉबर्ट बेनकेन आणि डग्लस हर्ले आहे.
या दोन्ही अंतराळवीरांना अमेरिकन कंपनी स्पेस एक्सचे   अंतराळयान ड्रॅगन येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठविण्यात येईल. स्पेस एक्स अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी आहे. ही कंपनी नासासोबत भविष्यासाठी अनेक अंतराळ मोहिमेसाठी कार्य करीत आहे .
स्पेस एक्स ड्रॅगन यान अमेरिकेतील सर्वात विश्वासार्ह क्षेपणास्त्र (फॉल्कन- 9) च्या वरील भागात जोडण्यात येईल. यानंतर (फॉल्कन - 9) या क्षेपणस्त्रास फ्लोरिडाच्या  (लॉन्च कॉम्प्लेक्स 39 - ए) येथून प्रक्षेपित करण्यात येईल. या मोहिमेस (डेमो - 2) असे नाव देण्यात आले आहे.
(डेमो - 1) या मोहिमेत ड्रॅगन अंतराळयानाच्या सहाय्याने स्थानकावर यशस्वीरित्या साधन पोहोचविण्यात आले होते. या मोहिमेत रॉबर्ट बेनकेन अवकाशयानाचे डॉकींग म्हणजेच अंतराळ स्थानकास जोडलेले, अनडॉकींग म्हणजे अंतराळ स्थानकापासून विभक्त होणे आणि त्याचे मार्ग निश्चित करतील. बेनकेन यांनी यापूर्वी 2008 आणि 2010 मध्ये अशा प्रकारे दोन वेळा अंतराळ स्थानकास भेट दिली आहे. तसेच त्यांनी तीन वेळा स्पेसवॉक देखील केला आहे. त्याचवेळी डग्लस हर्ले हे ड्रॅगन अंतराळयानाचे कमांडर असतील. प्रक्षेपण, लँडिंग आणि पुनर्प्राप्तीसाठी देखील तेच जबाबदार असतील.  डग्लस यांनी 2009 आणि 2011 मध्ये अंतराळ स्थानकास भेट दिली होती. पेशाने ते सिव्हिल इंजिनिअर होते. त्यानंतर 2000 मध्ये त्यांचे संबंध नासासोबात जोडले गेले.  यापूर्वी डग्लस हर्ले यू एस कॉर्प मध्ये फायटर पायलट होते.
मे महिन्यात प्रक्षेपित होणाऱ्या मोहिमेनंतर हे दोन्ही अंतराळवीर अंतराळ स्थानकावर 110 दिवसांपर्यंत राहतील. तसेच असेही म्हटले जाते की, स्पेस एक्स ड्रॅगन  कॅप्सूल एकाच वेळी 210 दिवस अंतराळात वेळ घालवू शकते. त्यानंतर त्यास दुरुस्तीसठी पृथ्वीवर यावे लागेल.
तसेच नऊ वर्षानंतर अमेरिकन अंतराळ संस्था नासा कॉमर्शिअल क्रू प्रोग्राम सुरु करीत आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर अमेरिकेला त्यांच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठविण्यासाठी रशिया आणि युरोपियन देशांकडे गरज भासणार नाही.  27 जुलै 2011 रोजी नासाने त्यांचा सर्वात यशस्वी स्पेस शटल प्रोग्राम बंद केला होता. याच दिवशी स्पेस शटल एटलांटीस पृथ्वीवर परतले होते. स्पेस शटल प्रोग्रामद्वारे  अंतराळ स्थानकाकरिता 135 उड्डाणे भरण्यात आली होती. 30 वर्षे सुरू असलेल्या या प्रोग्राम मध्ये 300 हून अधिक अंतराळवीरांना अंतराळात पाठविण्यात आले होते.
ARS
(आय एस एस, रॉबर्ट बेनकेन आणि डग्लस हर्ले,  क्षेपणास्त्र फॉल्कन- 9, लॉन्च कॉम्प्लेक्स 39 - ए, डेमो - 2,
डेमो - 1, अमेरिकन अंतराळ संस्था नासा कॉमर्शिअल क्रू प्रोग्राम.)

Thursday, 5 December 2019

#अंतराळात पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक कंपन्या करणार अंतराळ हॉटेलची निर्मिती !

#अंतराळात पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक कंपन्या करणार अंतराळ हॉटेलची निर्मिती !: कॅलिफोर्निया, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंतराळात पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक कंपन्या तेथे हॉटेलची निर्मिती करण्यासाठी स्पर्धा करीत आहेत. तुमच्यासाठी हॉटेलमध्ये शयनकक्ष उपलब्ध होऊ शकतील. तसेच आपण टेनिस आणि इतर खेळांचा आनंद घेऊ शकता. आणि तुम्हाला पृथ्वीवरील विलक्षण दृश्य हृदयात सजवून ठेवता येई

Friday, 15 November 2019

#भारताच्या स्वदेशी मोहिमेद्वारे प्रथमच अंतराळवीर पाठवणार!

#भारताच्या स्वदेशी मोहिमेद्वारे प्रथमच अंतराळवीर पाठवणार!: बंगळुरू, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गगनयानातून अंतराळात जाण्याकरिता अंतराळवीरांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असून व्यावसायिक पद्धतीने हे कार्य होणार आहे. अशी माहिती हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी दिली आहे. गगनयान इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) चा हा प्रकल्प आहे. या

#मी टू :  दोन मुलींचे वडील अशा कृतीचा विचार करू शकत नाही, अनु मलिक यांचे मुक्त पत्र !

#मी टू :  दोन मुलींचे वडील अशा कृतीचा विचार करू शकत नाही, अनु मलिक यांचे मुक्त पत्र !: नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संगीतकार अनु मलिक यांनी अखेर त्यांच्यावर करण्यात आलेल्या मीटूच्या आरोपांविषयी शांततेची सीमारेषा ओलांडली आहे. त्यांनी मीटूच्या आरोपांना नकार देत एक मुक्त पत्र ट्विटरवर सामायिक केले आहे.

अनु मलिक यांनी असे म्हटले आहे की, एक वर्षापासून माझ्यावर असे आरोप करण